Kokan: बांदा केंद्र शाळेत राष्ट्रीय एकता दिनाची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

0
55
राष्ट्रीय एकता दिन
बांदा केंद्र शाळेत राष्ट्रीय एकता दिनाची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

सावंतवाडी: संजय भाईप

लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकदा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.https://sindhudurgsamachar.in/kokan-हेट-स्पीच-आणि-धार्मिक-भा-2/

अनेक भारतीय संस्थानांचे देशात विलीनीकरण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतासारख्या वैविध्यतेने परिपूर्ण अशा देशात येथील लोकांमधील एकता अत्यंत महत्त्वाची आहे.ज्यावेळी अनेक संस्थानांचे तुकडे झाले होते ,त्यावेळी वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या संकल्पनेचे समर्थन केले होते . त्यामुळे त्यांच्या हा जन्म दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून देऊन एकतेची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात आत घालून मानवी साखळीचे रिंगण बनवून‌ एकात्मतेचे प्रदर्शन करून ‘एक भारत ,श्रेष्ठ भारत’ अशा घोषणा दिल्या.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक उर्मिला मोर्ये यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here