पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार – नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले

0
356

सावंतवाडी – पर्यटन हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून राजघराण्याची सून म्हणून सावंतवाडीला आल्यानंतर संस्थानच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची जपणूक करत राजवाड्यात हेरिटेज हॉटेल सुरू करण्यात आले. या उपक्रमामुळे देश-विदेशातील अनेक पर्यटक सावंतवाडीसारख्या निसर्गसंपन्न शहराकडे आकर्षित झाले असून स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत, असे मत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले.

हेरिटेज हॉटेलच्या माध्यमातून राजघराण्याची परंपरा, संस्कृती आणि इतिहास पर्यटकांपर्यंत पोहोचवता आला, याचे समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की पर्यटन विकासातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. भविष्यात सावंतवाडीच्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here