दापोली- दिवाळी सणाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या किल्ल्याचे परिसरातील अनेकांनी कौतुक केले असून या शाळेतील विद्यार्थी छोटे किल्लेदार बनले आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-खळा-बैठका-आदित्य-ठाकरे-य/
शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील वेदांत शिगवण, अथर्व रांगले, इशांत पागडे, प्रसाद शिगवण, दीप शिगवण, सोहम मुलूख, श्रेयश मुळे, विराज मुलूख, आयुष मिसाळ, शमिका मुलूख, वेदिका मुलूख, पुर्वा जगदाळे, वैष्णवी आंबेलकर, दिया मुलूख, मंजिरी पवार, श्रावणी कोळंबे या विद्यार्थ्यांनी या सुंदर किल्ल्याची निर्मिती केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, मनोज वेदक, मानसी सावंत यांनी किल्ल्याच्या प्रतिकृतीचे कौतुक केले.
याशिवाय चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण आदी अनेकांनी चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरात माती, दगड, रंग वापरून बनविलेल्या किल्ल्याचे कौतुक केले आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून चंद्रनगर शाळेतील विद्यार्थी छोटे किल्लेदार बनले आहेत.