Kokan: रस्ता डांबरीकरण कामाला प्रारंभ

0
78
रस्ता डांबरीकरण कामाला प्रारंभ
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान निधीतून सुमारे २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केलेल्या वेंगुर्ला शहरातील बॅ. खर्डेकर कॉलेज ते दिलीप सामंत यांचे घरापर्यंत जाणा-या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

वेंगुर्ला प्रतिनिधी-शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान निधीतून सुमारे २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केलेल्या वेंगुर्ला शहरातील बॅ. खर्डेकर कॉलेज ते दिलीप सामंत यांचे घरापर्यंत जाणा-या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुशेवाडा-येथे-नविन-हवामा/

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील नागरीकांना पायाभुत व अत्यावश्यक ठरणा-या विकास कामांना प्राधान्याने निधी दिला जात आहे. शहरातील कांही रस्त्याची कामे व डागडुजी करावयाची आहे, अशी कामे श्री. केसरकर यांना सांगितलेली असून लवकरच ती कामे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती शहरप्रमुख उमेश येरम यांनी दिली. यावेळी युवक शहर अध्यक्ष संतोष परब,राजू परब, संजय परब, प्रभाकर पडते यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here