कोल्हापूर : ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी विद्युत यंत्रणेची नियमित देखभाल-दुरूस्ती आवश्यक असते. ग्राहकसेवेसाठी उपकेंद्र सदैव सज्ज ठेवण्यासाठी कोल्हापूर ग्रामीण विभाग १ मधील कोडोली उपविभागाच्या ३३/११ केव्ही सातवे उपकेंद्रात ‘एक दिवस-एक उपकेंद्र’ ही मोहिम राबविण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एजिस-फेडरल-इन्शुरन्स/
उपकेंद्र परिसरातील स्वच्छतेसह पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑइल पातळी तपासणी, आयसोलेटरचे ऑईलिंग व ग्रिसिंग, बॅटरी देखभाल, ११ केव्ही फिडरचे जंप बदलणे, उपकेंद्र आर्थिंगचे काम अशी तांत्रिक कामे करण्यात आली. कार्यकारी अभियंता श्री.दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब मुंडे, कोडोलीच्या उपविभागीय अधिकारी सौ. सारिका शेळके यांनी कामकाज पाहिले. शाखा अभियंता श्री.चौगुले आणि श्री. वाळके यांच्या सुचनेनुसार सातवे व काखे शाखा कार्यालयातील जनमित्र, यंत्रचालक यांनी उपकेंद्रातील काम केले.