AAI च्या आकडेवारीने भारतीय विमान वाहतुकीबाबतचे गैरसमज खोडून काढलेl
Mumbai l प्रतिनिधी :
भारतीय विमान वाहतूक केवळ महानगरांपुरती मर्यादित असून खाजगी विमानतळांनाच वाढ मिळते, असे प्रचलित गैरसमज एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांनी नोव्हेंबर २०२५ साठी प्रसिद्ध केलेल्या तथ्य-पत्रिकेमुळे फोल ठरले आहेत.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतील आकडेवारीनुसार, सर्वाधिक वेगाने वाढणारी विमानतळे ही महानगरांबाहेरील शहरांमधील आहेत. पाटणा विमानतळाने २२ टक्के वाढीसह पहिला क्रमांक मिळवला असून, इंदूर, वाराणसी, गोवा मोपा आणि भुवनेश्वर यांचा त्यात समावेश आहे.
तसेच, वेगाने वाढणाऱ्या पाच विमानतळांपैकी चार विमानतळे AAIद्वारेच चालवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रो शहरांमध्ये चेन्नई विमानतळाने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. घट झालेल्या विमानतळांमागे धावपट्टी बंद असणे हे प्रमुख कारण असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
AAIच्या आकडेवारीनुसार, भारतीय विमान वाहतुकीतील वाढ ही कोणत्याही पक्षपातामुळे नव्हे, तर मागणी, पर्यटन आणि आर्थिक घटकांवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे.


