पनवेल पोलिसांची धडाकेबाज कारवाई; रेल्वे स्टेशन परिसरातून पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे जप्त

0
262

पनवेल l प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी सतर्कता बाळगत धडाकेबाज कारवाई केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून पोलिसांनी एका संशयितांकडून एक पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार यांना गोपनीय बातमीदाराकडून एका संशयितास बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा लावला.

तपासादरम्यान अनंथ अधिमुलाम पाडायची (रा. सानपाडा) या संशयितास ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आले.

त्याच्याविरुद्ध दि. 28 डिसेंबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे असलेले शस्त्र कशासाठी आणले होते आणि कोणाला विक्री करायचा होता, याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here