मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस पाटील नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली असून कणकवली,देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत १३४ पोलिस पाटील पदांच्या भरती साठीची लेखी परिक्षा येत्या रविवारी होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-पक्षाची-आढावा-बै/
या परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांकडून या परिक्षेची पुर्वतयारी करून घेण्यासाठी ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्ग तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कणकवली रेल्वे स्थानका नजिकच्या वाळकेश्वर मंगल कार्यालय, मुडेडोंगरी येथे शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायं.४.३० यावेळेत करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर्व परिक्षार्थींसाठी खुली व मोफत आहे.