वेंगुर्ला प्रतिनिधी- मठ येथील कै. रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नं.१ ही शाळा शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त २४ डिसेंबर २०२३ ते २४ डिसेंबर २०२४ या पूर्ण वर्षभरात अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी यशवंत उर्फ आबा मठकर यांची निवड केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-बागायतदारांनी-अनुदानीत/
शताब्दी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू मंगल कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमभाई मोबारकर यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीने माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी यांची संयुक्त सभा पार पडली. यावेळी स्थापन केलेल्या समितीमध्ये अध्यक्ष-आबा मठकर, उपाध्यक्ष-विद्याधर कडुलकर व दिपाली गावडे, सचिव-रविद्र खानोलकर, सहसचिव-विनोद शेणई, खजिनदार-किशोर पोतदार व मिलिद खानोलकर यांचा समावेश आहे. वर्षभरातील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी केंद्रशाळा मठ नं.१ मध्ये सकाळी १० वाजता मेळावारूपी सभा आयोजित केली आहे. तरी यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, माजी शिक्षक व शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन शतक महोत्सव समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष यशवत उर्फ आबा मठकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३३०१३३५ यावर संफ साधावा.