वेंगुर्ला प्रतिनिधी – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्यशासनाच्या मार्च २०२३ अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील सुमारे १ कोटी ३ लाख ४० हजारांच्या विविध रस्त्यांच्या मंजूर विकासकामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-पर्यावरणात-पर्वतांना-अन/
यावेळी रुपेश पावसकर, महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत कविटकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, विधानसभा प्रमुख प्रेमानानंद देसाई, राजन रेडकर, कोचरा सरपंच योगेश तेली, माजी उपसरपंच देवदत्त साळगांवकर, रोहित म्हापणकर, चिपी माजी सरपंच गणेश तारी, सोसायटी चेअरमन ब्रिजेश तायशेटये, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार, संजय गोसावी, प्रगती राऊळ, विशाल वेंगुर्लेकर, सौ. परब, अभय परूळेकर, सुनाद राऊळ यांच्यासह अन्य उपस्थित होते.
केसरकर यांच्या माध्यमातून कोचरा चव्हाटावाडी ते राऊळवाडी आगारवाडी रस्ता ग्रामीण मार्गमध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाला सुमारे २० लाख, कोरजाई आनंदवाडी कर्ली रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामासाठी सुमारे २० लाख ११ हजार, परुळे भगवती मंदिर ते मेरवाचे पाणी रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामासाठी सुमारे १६ लाख ७८ हजार, मालवण देवली, तारकर्ली, परुळे रस्ता मजबुतीकरणासह रुंदीकरण करणे या कामाला सुमारे २१ लाख ५० हजार, कोचरा चव्हाटा ते उंबराचे पाणी रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामासाठी सुमारे २५ लाख असा मिळून म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील या विकासकामांसाठी एकूण १ कोटी ३ लाख ४० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
फोटोओळी – म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील सुमारे १ कोटी ३ लाख ४० हजारांच्या विविध रस्त्यांच्या मंजूर विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.