राजकीय गदारोळात माणुसकी जिंकली !

0
94
राजकीय गदारोळात माणुसकी जिंकली !
राजकीय गदारोळात माणुसकी जिंकली !

राजकीय गदारोळात माणुसकी जिंकली !

 सोलापुरात पक्षभेद विसरून मदतीचा हात

सोलापूर l

उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेच्या गोंधळात सुरू असलेल्या धावपळ दरम्यान सोलापुरात माणुसकीचे दर्शन घडले. या धावपळीत भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना अचानक धाप लागली.

ही परिस्थिती लक्षात येताच काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत तत्काळ पुढे येऊन तडवळकर यांना सावरण्यास मदत केली. राजकीय संघर्षाच्या वातावरणात घडलेला हा प्रसंग मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण ठरला.

या घटनेमुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीला प्राधान्य देण्याचा संदेश मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here