सिंधुदुर्ग: सर्वसामान्यांसाठी देशभरात सरकारी रुग्णालये आहेत. त्या रुग्णालयांची स्थिती काय असते हे देशातील सर्वच नागरिकांना माहित आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील सरकारी रुग्णालयांची स्थिती यापेक्षा वेगळी असू शकेलच कशी? https://sindhudurgsamachar.in/kokan-ग्रामसेवकांचा-संप-रत्ना/
आजच हाती आलेल्या वृतानुसार सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयात कॅल्शियमच्या गोळ्या नाहीत. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा रूग्णालयात या गोळ्या आलेल्याच नाहीत. जिल्हा रूग्णालयामधील इतर औषधांचीही हीच परिस्थीती असल्याचे सुत्राधारे समजले आहे. देशातील सर्वच सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराच्या जाहिराती झळकत असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. परंतु जिल्हा रूग्णालयात औषधांचा साठाच उपलब्ध नसल्याने नागरिकांत संताप व्याक्त होत आहे.