⭐कोलगाव – आकेरी येथे चारचाकीची झाडाला धडक ; अन्य ३ युवक जखमी
⭐कुडाळ – पिंगुळी उत्कर्षनगर येथील 21 वर्षीय तरुणी ऐश्वर्या महेश कवठणकर हीचा जागीच मृत्यू.
सावंतवाडी :- थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाचे स्वागत सावंतवाडीत करून कुडाळ येथे पहाटेच्या सुमारास जात असताना मारुती सुझुकी चारचाकी कोलगाव नजीक एका झाडावर आदळल्याने चारचाकी वाहनातील 21 वर्षीय तरुणी ऐश्वर्या महेश कवठणकर ही जागीच ठार झाली. तर चारचाकी चालक तिचा मित्र सिद्धार्थ बांदेकर हा जखमी झाला आहे. तर, अन्य दोन तरुण यांनाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नवी-मुंबईत-ट्रक-चालक-आंद/
कुडाळ येथील मित्र व त्यांची मैत्रीण असे चौघेजण कुडाळ येथे थर्टी फर्स्ट केल्यानंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत आले होते.नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषी केल्यानंतर सावंतवाडीतून घरी परतताना कोलगाव -आकेरी मार्गे कुडाळ येथे जात असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालक सिद्धार्थ बांदेकर यांची कार भल्या मोठ्या झाडाला आदळली अन् अपघात झाला. अपघाताची खबर कळताच सिद्धार्थ बांदेकरचे मामा राजू वाळके व त्यांच्या मित्रमंडळाने धाव घेत जखमी तरुणांना गाडीच्या बाहेर काढले. तर गाडीत असलेली कु. ऐश्वर्या कवठणकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती .गाडीमध्ये अडकल्याने या सर्वांना गाडी बाहेर काढण्यात आले. आणि पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सावंतवाडी रुग्णालयात ऐश्वर्या कवठणकर हिचे वडील ,काका व मित्रमंडळाने धाव घेतली. ऐश्वर्या कवठणकर ही कुडाळ येथे उत्कर्षनगर, रामेश्वर प्लाझा, पिंगुळी येथे राहते. तिच्या मागे आई-वडील भाऊ व दोन काका काकी असा परिवार आहे .सिद्धार्थ बांदेकर याच्यासोबत तिचे लग्न ठरवण्यात आले होते .मात्र काही महिन्यानंतर दोघांचे लग्न होणार होते. मात्र काळाने ऐश्वर्यावर घाला घातला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंब शोक सागरात बुडाली आहेत .पोलीस अधिकारी श्री गोते व मनोज राऊत काम पाहत आहेत.