कुडाळात जि.प., पं.स. निवडणुकीसाठी अर्ज विक्रीला सुरुवात; पहिल्या दिवशी १४ जणांनी घेतले नामनिर्देशन पत्र

0
81
रत्नागिरी जिल्ह्यात ५८% मतदान
रत्नागिरी जिल्ह्यात ५८% मतदान

कुडाळात जि.प., पं.स. निवडणुकीसाठी अर्ज विक्रीला सुरुवात; पहिल्या दिवशी १४ जणांनी घेतले नामनिर्देशन पत्र

कुडाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी एकूण १४ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज खरेदी केले; मात्र, एकही उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांचा समावेश असल्याचे चित्र आहे.

कुडाळ तहसील कार्यालयातून जिल्हा परिषदेसाठी ५ तर पंचायत समितीसाठी ९ असे एकूण १४ नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आले. जिल्हा परिषद गटांसाठी माणगाव – सदाशिव परशुराम आळवे (अपक्ष), ओरोस बुद्रुक – रामदास गोपाळ ठाकूर (अपक्ष), नेरूर देऊळवाडा – बाळकृष्ण गुरुनाथ पावसकर (अपक्ष), पावशी – मंदार सखाराम कोठावळे (अपक्ष) आणि वेताळबांबर्डे – अनंतराज नंदकिशोर पाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट) यांनी अर्ज विकत घेतले.

पंचायत समितीसाठी झाराप – सदाशिव आळवे (अपक्ष), पिंगुळी – कश्मिरा केतन शिरोडकर यांच्यासाठी केतन विजय शिरोडकर (अपक्ष), डिगस – विनायक जनार्दन अणावकर (शिंदे शिवसेना व अपक्ष), कसाल – चंद्रकांत अनंत राणे (शिंदे शिवसेना – दोन अर्ज), आंब्रड – अंकित विनायक नार्वेकर (शिंदे शिवसेना), डिगस – मंदार सखाराम कोठावळे (अपक्ष) तसेच ओरोस बुद्रुक – अनंतराज नंदकिशोर पाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट) यांनी अर्ज खरेदी केल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुट्टीचे दिवस वगळून बुधवार, २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here