‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिकमध्ये आगमन
झ्युरिक : *‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६’*च्या निमित्ताने पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे आगमन झाले. यावेळी परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांनी त्यांचे मराठमोळ्या, पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येत्या काळात महाराष्ट्र हे भारतातील ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे अग्रणी राज्य म्हणून उदयास येईल. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी माणसाचा महाराष्ट्राबद्दलचा अभिमान आणखी वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि उत्साही वातावरणात झालेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित मराठी बांधवांचे आभार मानले. तसेच विदेशात राहणारे मराठी बांधव हे ‘महाराष्ट्राचे जागतिक राजदूत’ आहेत, अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला.


