Kokan: बॅ.खर्डेकर महाविद्यालयात शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न

0
75
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्यावतीने ४ व ५ जानेवारी रोजी येथील साई दरबार हॉल येथे संपन्न झालेल्या. मुंबई विद्यापीठ कोकण झोन ४ (सिधुदुर्ग, रत्नागिरी,  रायगड) पुरूष शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रणय चोरगे, हेमंत पवार, किशोर म्हापदी, आयुष सुर्वे यांन प्रथम क्रमांक पटकाविला. https://sindhudurgsamachar.in/kokan-गणपतीपुळेतील-हाॅटेल-व्य/

स्पर्धेचे उद्घाटन बॅ.बी.के.कॉलेजचे स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेंद्र खामकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य एम.बी.चौगले, आंतरराष्ट्रीय शरीरासौष्ठव खेळाडू मंगेश गावडे, स्पर्धेचे नॅक कोऑर्डिनेटर डी.बी.राणे, पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सुरेंद्र चव्हाण, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा.चंद्रकांत नाईक, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे डॉ.विनोद शिदे उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये ६० किलोवजनी गटात प्रणय चोरगे (आबासाहेब मराठे कॉलेज, राजापूर), हर्ष थले (पीपीईएस कॉलेज, अलिबाग), आनंद राऊळ (एस.पी.के.कॉलेज, सावंतवाडी),  ६५ किलोवजनी गटात हेमंत पवार (आय.सी.एस.कॉलेज खेड), प्रितम कांजर (आबासाहेब मराठे कॉलेज, राजापूर),  ७० किलोवजनी गटात किशोर म्हापदी (आय.सी.एस.कॉलेज खेड),  ८० किलो वजनी गटात आयुष सुर्वे (गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी) यांनी यश मिळविले.

या सर्वांची मुंबई विद्यापीठस्पर्धेकरीता निवड झाली आहे. पंच म्हणून विजय मोरे, किशोर सोन्सुरकर व रामकृष्ण चितळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन क्रीडासंचालक प्रा.जे.वाय. नाईक व डॉ.कमलेश कांबळे यांनी केले.

फोटोओळी – स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here