Kokan: राष्ट्रहित व देशनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्या!- आत्माराम गावडे

0
97
अणसूर पाल हायस्कूल, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ,
राष्ट्रहित व देशनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्या!- आत्माराम गावडे

वेंगुर्ला प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यशाची शिखरे सर करताना, राष्ट्रहित व देशनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन अणसूर पाल हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-अभियानाच्या-माध्यामातू/

अणसूर पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या बहुद्देशीय सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे दादासाहेब परुळकर, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य देवू गावडे, दिपक गावडे, दत्ताराम गावडे, माजी मुख्याध्यापक शैलजा वेटे, वासुदेव वेटे, अनिल गडकर, आनंद गावडे, वासुदेव बर्वे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध वृत्तपत्रे वाचन, मराठी भाषा साहित्य, हिंदी साहित्य, इंग्रजी साहित्य, भुगोल, विज्ञान, गणित या शैक्षणिक कट्ट्यांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे दादासाहेब परुळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यानी केवळ नोकरीच्या मराठी मानसिकतेतून बाहेर पडून यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन दादासाहेब परुळकर यांनी केले.    

या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सन २०२३-२४चा आदर्श विद्यार्थी मंदार नाईक, सर्वोत्कृष्ट खेळाडू बाळकृष्ण राऊळ व माल्विका वारंग, एसएससी मार्च २०२३ प्रथम ऋतुजा आमडोसकर, द्वितीय सानिया पालकर व तृतीय दिव्यश्री परब, तसेच संस्था पारितोषिके, वैयक्तिक पारितोषिके, सहशालेय-शैक्षणिक- क्रीडा-सांस्कृतिक पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, क्रीडा पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक शैलजा वेटे व वासुदेव वेटे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शैलजा वेटे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पन्नास हजार रूपयांचा धनादेश शाळेला दिला.

मान्यवरांचे स्वागत शालेय मुख्यमंत्री आदर्श गावडे, विद्यार्थनी प्रमुख पूर्वा आमडोसकर, स्नेहसंमेलन प्रमुख चारुता परब यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय प्रगतीचा अहवाल मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी सादर केला. शैक्षणिक व सहशालेय पारितोषिकांचे वाचन अक्षता पेडणेकर तर क्रिडा पारितोषिकांचे वाचन विजय ठाकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार स्नेहसंमेलन प्रमुख चारुता परब यांनी मानले.

फोटोओळी – अणसूर पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here