Kokan: पोलीस रेझिंग डे निमित्ताने देवगड पोलीस व नागरिक यांचा सुसंवाद

0
27
पोलीस रेझिंग डे निमित्ताने देवगड पोलीस व नागरिक यांचा सुसंवाद
पोलीस रेझिंग डे निमित्ताने देवगड पोलीस व नागरिक यांचा सुसंवाद

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

देवगड – देवगड पोलीस ठाणे यांनी पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलीस व नागरिक यांचा सुसंवाद व्हावा याकरिता एक परिसंवाद आयोजित केला होता.हा परिसंवाद शेठ म ग विद्यालय, देवगड येथे जाऊन घेण्यात आला. या परिसंवादाला 250 विद्यार्थी 10 शिक्षक उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-न-प-तर्फे-भिती/

यावेळी, पोलीस दल रचना, कार्यपद्धती, पोलीस दलात प्रवेश करीता असणारे विविध संधी व स्पर्धा परीक्षेचे स्वरूप,पोलीस वापरात असलेले हत्यारे, दारूगोळा यांची माहिती देण्यात आली. तसेच महिला व बालकां विषयी कायदे,सायबर गुन्हा ,ऑनलाईन आर्थिक फसवणूक इ. विषयांवर माहिती दिली. तसेच शालेय स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here