कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा)चा ७ सदस्यीय गट स्थापन
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सात नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची, तर प्रतोदपदी संकेश भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महानगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या भूमिकेतून शहरातील नागरी प्रश्न, मूलभूत सुविधा, विकासकामे तसेच नागरिकांच्या अडचणी प्रभावीपणे मांडण्यासाठी हा गट सक्रिय राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळात महापालिकेच्या कामकाजात शिवसेना (उबाठा)ची भूमिका अधिक ठळकपणे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


