देश-विदेश: इंदिरा आयव्हीएफने चेतवल्या जागतिक आकांक्षा; केला आंतरराष्ट्रीय फर्टीलिटी बाजारपेठेत प्रवेश

0
62
इंदिरा आयव्हीएफ,
इंदिरा आयव्हीएफने चेतवल्या जागतिक आकांक्षा; केला आंतरराष्ट्रीय फर्टीलिटी बाजारपेठेत प्रवेश

नेपाळमधील काठमांडू येथे पहिले आंतरराष्ट्रीय रुग्णालय सुरू

नेपाळ: वंध्यत्व उपचार रुग्णालयांचे भारतातील सर्वात मोठे नेटवर्क इंदिरा आयव्हीएफने नेपाळ मधील काठमांडू येथे आपल्या रुग्णालयाच्या उद्घाटनासह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. जुलै २०२३ मध्ये इंदिरा आयव्हीएफ मधील बहुतांश मालकी  म्हणून दाखल झालेल्या जागतिक खाजगी इक्विटी फर्म EQT च्या पाठबळावर विकासाचा पुढचा टप्पा सुरू करत, भारतीय सीमेपलीकडे संस्थेची ही पहिली वाटचाल आहे. इंदिरा आयव्हीएफला आपले कौशल्य आग्नेय आशियाई देश, मध्यपूर्व, युरोपियन आणि आफ्रिकन देश यांच्यापर्यंत  पोहोचवायचे आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-ace-turtle-ने-प्रदीप-मुकी/

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जागतिक स्तरावर अंदाजे प्रत्येक सहा लोकांपैकी एकाला त्यांच्या जीवनात कधीतरी गर्भधारणेच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लाखो लोकांसाठी  वंध्यत्व ही गंभीर समस्या बनली आहे. गर्भधारणेविषयक समस्या विकसित आणि विकसनशील दोन्ही राष्ट्रांमध्ये असून उच्च खर्च, सामाजिक कलंक आणि उपायसुविधांची मर्यादित उपलब्धता यांच्यामुळे या आव्हानांमध्ये वाढ होते. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही अनुभवायला लागणारी वंध्यत्व विषयक समस्यांची गुंतागुंत या प्रश्नाच्या स्वरूपात भर घालते. विविध भूप्रदेश आणि समाज यांच्यामध्ये पसरलेली गर्भधारणेविषयक उपचारांची जागतिक पातळीवरील मागणी सर्वसमावेशक उपाय सुविधांच्या अत्यावश्यकतेला अधोरेखित  करतात.

२०२०-२१ साठी मेडिकल टुरिझम इंडेक्स (MTI) मध्ये जगातील ४६ स्थानांपैकी १० व्या क्रमांकासह भारत हे वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनले आहे. अत्याधुनिक सुविधा, नामांकित आरोग्यसेवा व्यावसायिक, आर्थिक व्यवहार्यता, डॉक्टरांची लवकर मिळू शकणारी भेट आणि रुग्णालयांची मान्यता यामुळे याला चालना मिळते. लैंगिक, प्रजनन आणि गर्भधारणा उपचार यासाठी वाढत्या प्रमाणात रुग्ण भारतात भेट देऊ लागले आहेत. भारतातील इंदिरा आयव्हीएफच्या रुग्णालयांमध्ये नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील ४०० हून अधिक रुग्ण त्यांच्या वंध्यत्वविषयक उपचारांसाठी आले आहेत. 

संस्थेच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराबाबत बोलताना इंदिरा आयव्हीएफचे व्यवस्थापकीय संचालक आणि सहसंस्थापक श्री नितीझ मुर्डिया म्हणाले,“आमचा दृष्टीकोन आणि ध्येय वंध्यत्व  निर्मूलन असून  एक स्वाभाविक प्रगतीचा भाग म्हणून आम्ही आमच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी सक्रियपणे जागतिक  बाजारपेठांचा मागोवा घेत आहोत. प्रवेश करणार असलेल्या प्रत्‍येक देशामध्‍ये अग्रणी बनण्‍याच्‍या उद्देशाने आम्ही काळजीपूर्वक आंतरराष्‍ट्रीय विस्‍तार धोरण तयार केले आहे. वंध्यत्वाच्या समस्येचे कुटुंबांवर बहुविध परिणाम होत असतात.  त्यात भावनिक, आर्थिक आणि सामाजिक पैलूंचाही समावेश असतो. या आव्हानांवर सर्वसमावेशक उपायसुविधा पुरविण्यासाठी आम्‍ही वचनबद्ध आहोत. आमच्या दृष्टिकोनाला जागतिक वास्तवाचे रूप देत जगभरातील व्यक्ती आणि कुटुंबांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी समर्पित भावना ठेऊन आमचे हे प्रयत्न सीमेपलीकडेही पसरलेले आहेत.” 

नेपाळमधील अलीकडील विस्तारावर भाष्य करताना, इंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक डॉ. क्षितिज मुर्डिया म्हणाले,  “२०१९-२१ मध्ये  भारतातील प्रति स्त्री २.० या जन्मदराच्या  तुलनेत नेपाळमध्ये प्रजनन दरात सातत्याने घट होत असून २०२३ मध्ये प्रती स्त्री मागे १.७९९ जन्मदर या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.  भारतातील पहिले संघटित सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) वापरकर्ते म्हणून इंदिरा आयव्हीएफ वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबांना सुलभ प्रजनन उपायसुविधा पुरविण्यासाठी देशभरात आणखी पाच दवाखाने स्थापन करण्याची योजना आखत आहे. भारतातील आमच्या दृष्टिकोनाप्रमाणेच आमचे ध्येय पालकत्वाची स्वप्ने पूर्ण करू पाहणाऱ्या सर्व कुटुंबांसाठी विश्वासू सहयोगी बनण्याचे आहे.”

EQT हे जागतिक स्तरावर सर्वात मोठे आणि सर्वात सक्रिय आरोग्यसेवा गुंतवणूकदारांपैकी एक आहे आणि गेल्या ३० वर्षांत, फर्मने त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुरुवातीच्या टप्प्यातील जीवन विज्ञान स्टार्ट-अप ते जागतिक बाजारपेठेतील अग्रणी २०० पेक्षा जास्त आरोग्यसेवा कंपन्यांमध्ये २५ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.  जुलै २०२३ मध्ये बहुतांश मालकी घेतल्यानंतर,EQT चे उद्दिष्ट इंदिरा आयव्हीएफला त्याच्या वाढीच्या पुढील टप्प्यात पाठबळ देण्यासाठी सखोल आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य आणिजागतिक नेटवर्कचा लाभ मिळवून देणे आहे.

भारतातील EQT चे भागीदार आशिष अग्रवाल पुढे म्हणाले, “जगभरात वंध्यत्वाची समस्या वाढत आहे आणि आता ती एक प्रमुख आरोग्यविषयक समस्या बनली आहे. देशभरातील अनेक जोडप्यांची स्वप्ने पूर्ण करत इंदिरा आयव्हीएफ ने भारतात अग्रणी पुढे राहून सर्वोत्कृष्ट वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांसह हे आव्हान पेलले. हाच दृष्टिकोन बाळगत इंदिरा आयव्हीएफ ने आता नेपाळमध्ये प्रवेश करून आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात केली आहे. जागरुकता वाढवून आणि इष्टतम उपचार देऊन मुख्य समस्यांचे निराकरण करणे हे इंदिरा आयव्हीएफ चे उद्दिष्ट आहे. EQT ची गुंतवणूक इंदिरा आयव्हीएफ च्या सिद्ध कार्यपद्धतीवरील आमचा विश्वास दर्शवते आणि त्यांच्या परिवर्तनात्मक वाढीच्या पुढील टप्प्याचा भाग होण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.”

प्रमाणीकरण राखण्यासाठी, जागतिक स्तरावर सर्व तज्ञ आणि कर्मचारी सदस्यांना इंदिरा फर्टिलिटी अकादमी (IFA) येथे प्रशिक्षण दिले जाईल. मर्क फाऊंडेशन आणि ब्रिटीश फर्टिलिटी सोसायटी द्वारे मान्यताप्राप्त, IFA ही इंदिरा आयव्हीएफ ची शैक्षणिक शाखा असून वंध्यत्व उपचारासाठी दृष्टीकोन आणि कौशल्य विकसीत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे. इंदिरा आयव्हीएफ च्या १२० हून अधिक रुग्णालयातील २,७०० हून अधिक तज्ञ आणि कर्मचारी यांना नवीनतम तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि मानक प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातून संस्थेचा थेट-ग्राहक दृष्टीकोन आणि वैद्यकीय परिणाम तयार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here