EVM विरोधात बाळराजे आवारे पाटील यांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरू

0
30
EVM विरोधात बाळराजे आवारे पाटील यांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरू
EVM विरोधात बाळराजे आवारे पाटील यांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरू

EVM विरोधात बाळराजे आवारे पाटील यांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरू

तांदुळवाडी : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (EVM) विरोधात बाळराजे आवारे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरू असून, त्यांच्या प्रकृतीची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. उपोषणामुळे अशक्तपणा वाढल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले असून, उपचार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहत त्यांनी उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

तांदुळवाडी येथे सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, उपोषणाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला आहे. EVM ऐवजी पारंपरिक मतदान पद्धतीचा अवलंब करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

या आंदोलनाचे पडसाद थेट मुंबईत उमटले. मुंबईतील महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असलेल्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असून, या आंदोलनावर तोडगा कसा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here