नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६’चे आयोजन

0
48
मराठी सक्तीचा नियम मोडणाऱ्या शाळांवर कडक कारवाई; शासनाची नवीन कार्यपद्धती जाहीर
मराठी सक्तीचा नियम मोडणाऱ्या शाळांवर कडक कारवाई; शासनाची नवीन कार्यपद्धती जाहीर

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६’चे आयोजन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. मराठी भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

या पंधरवड्यात व्याख्याने, काव्यवाचन, निबंध, वक्तृत्व, नाट्य, गीत-गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सर्व वयोगटांतील मराठी भाषाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. या सर्व कार्यक्रम व स्पर्धांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.

मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेशी नव्या पिढीला जोडणे आणि मराठीचा दैनंदिन वापर वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून, नवी मुंबईकरांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here