अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस अंतराळाच्या यात्रेवर

0
108

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिन नावाची स्वतःची कंपनी आहे. या कंपनीची स्पर्धा एलन मस्क यांच्या स्पेसएक्सशी आहे. त्यांनी ब्ल्यू ओरिजिन २००० मध्ये सुरू  केली. जेफ बेजोस अॅमेझॉन सीईओ पद सोडणार आहेत आणि त्यांनतर १५ दिवसां बेजोस अंतराळासाठी रवाना होणार आहेत. बेजोस यांनी सोमवारी त्यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिन पुढील महिन्यात पहिले मानव अंतराळ उड्डाण पाठवेल अशी घोषणा केली

बेजोस यांनी सांगितले, वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी अंतराळ प्रवासाचे स्वप्न बघत आलो आहे. २० जुलैला जिवलग मित्रासोबत मी एका नव्या साहसावर निघेन. बेजोस अंतराळात जाणारे पहिले अब्जाधीश असतील. हा मित्र त्यांच्याबरोबर जाणारा मित्र म्हणजे त्यांचा भाऊ मार्क बेजोस आहे असेही ते म्हणाले. ब्ल्यू ओरिजिनच्या रॉकेटमध्ये प्रवास करणाऱ्यांना ४ दिवसांचा अंतराळ प्रवासाचा अनुभव मिळेल. उड्डाणाचा एकूण प्रवास ११ मिनिटांचा असणार आहे.यात ३ दिवसांची प्री- फ्लाइट ट्रेनिंगही आहे. हे प्रशिक्षण कंपनीची लाँच साइट टेक्सासच्या वेन हॉर्नमध्ये दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ब्ल्यू ओरिजिन त्यांच्या पहिल्या अंतराळ उड्डाणातील एका जागेचा लिलाव करेल. यातून मिळालेली रक्कम गणित व विज्ञान शिक्षणाला चालना देणाऱ्या ब्ल्यू ओरिजिनच्या फाउंडेशनला दिली जाणार असल्याच त्यांनी सांगितल. या तिकीटाची किंमत २० हजार डॉलर्स आहे. एलन मस्क यांच्या स्पेसएक्सशी या कंपनी त्यांची स्पर्धा आहे नेहमीच असते. २०२० मध्ये स्पेसएक्स आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रापर्यंत मानवाला पोहोचवणारी पहिली खासगी कंपनी ठरली आहे आणि आता अंतरिक्षात मानवाला घेऊन जाणारी ब्ल्यू ओरिजिन ली खासगी कंपनी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here