Kokan: पालकमंत्र्यांनी मी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करण्यापेक्षा नारायण राणेंनी मंजूर केलेल्या खाजगी पडवे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या ५ कोटीच्या रस्त्याचे भूमिपूजन करून दाखवावे- आ. वैभव नाईक

0
32
विकास काम
आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरेत विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरेत विकास कामांचा धडाका

मसुरे तळाणीवाडी पूलासाठी साडेतीन कोटी, भरतेश्वर मंदिर ते मठ रस्त्यासाठी १९ लाख रु मंजूर

मसुरे खोत जुवा मशेश्वर मंदिर धूप बंधाऱ्याचे उद्घाटन

मसुरे: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी बजेट अंतर्गत लोकहिताची अनेक कामे मंजूर करून घेतली आहेत. शिंदे फडणवीस सरकारने त्यावर दिलेली स्थगिती कोर्टाने उठविली असून ती कामे सुरु करण्यात आली आहेत.याउलट नारायण राणेंनी लोकहिताची कामे डावलून आपल्या खाजगी पडवे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ कोटी रु. मंजूर करून घेतले.या निधीतून अनेक छोटे छोटे रस्ते मंजूर करता आले असते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करण्यापेक्षा नारायण राणेंनी मंजूर केलेल्या खाजगी पडवे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करून दाखवावे. जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्री देत असलेले योगदान आम्ही मान्य करतो.सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी त्यांनी अजून निधी आणावा असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्वच्छ-सर्वेक्षण-२०२३-मध/

आमदार वैभव नाईक यांनी महाविकास सरकारच्या काळात ३०५४ इतर जिल्हा मार्ग २०२१-२२ योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मसुरे आडवली प्रजीमा ५२ या रस्त्यावर मसुरे तळाणीवाडी येथे मोठे पूल मंजूर केले आहे. त्यासाठी ३ कोटी ५३ लाख रु मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तर मसुरे खोत जुवा येथील मशेश्वर मंदिर येथे धूप प्रतिबंधक बंधारा आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून बांधण्यात आला असून या कामाचे उद्घाटन करण्यात आले व त्यांनी बंधाऱ्याची पाहणी केली.त्याचबरोबर बजेट अंतर्गत मसुरे देऊळवाडी भरतेश्वर मंदिर ते मठ ग्रा.मा. २०९ या रस्त्याच्या कामासाठी १९ लाख मंजूर करण्यात आले आहेत.

याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर,पंकज वर्दम,अमित भोगले,विभागप्रमुख राजेश गांवकर,समीर लब्दे,विजय पालव, मर्डे सरपंच संदीप हडकर,कांदळगाव सरपंच रणजित परब,सुहास पेडणेकर,उपविभागप्रमुख राघवेंद्र मुळीक, मर्डे ग्रा पं सदस्य रिया आंगणे,कांदळगाव ग्रा.प. सदस्य राजू कदम,गणेश गांवकर,संतोष गांवकर, सुधीर गांवकर,उल्हास गांवकर,बळवंत गांवकर,उत्तम गांवकर,सिद्धेश गांवकर,कृष्णा गांवकर,केशव गांवकर,राहुल गोळे,बाबू सावंत,रवींद्र चव्हाण,तेजस बनये,संतोष दुखंडे अनिल वंजारे,निलेश नाईक,भाऊ आंगणे,शैलेश आंगणे,रुपेश आंगणे,राजू मेस्त्री, विठ्ठल परब,एकनाथ परब, नाथा मेस्त्री,उमेश बागवे,सिद्धेश गिरकर,दिनेश बागवे,नंदू मुळीक,प्रकाश मुळीक,तुकाराम परब,दामोदर परब,राजाराम मुळीक,पंकज, प्रतीक, शिवा मेस्त्री,हर्षद,संजय बागवे, सुदाम भोगले,दीपक भोगले,आशिष भोगले,नारायण मुळीक,महेंद्र मुळीक,नारायण आंगणे,रामदास कावले,मनोहर आंगणे,दीपक आंगणे,बटू आंगणे,भूषण आंगणे, खोतजुवा येथे रणजित खोत, निलेश खोत, महेंद्र खोत, चिंतामणी खोत, प्रताप खोत, साईप्रसाद खोत, प्रणय खोत, शंकर खोत, सुधीर खोत, समीर खोत, दीपक खोत, लक्षुमन खोत, भीमसेन खोत, गुरुनाथ खोत, जय खोत, राज खोत, हर्ष खोत, सोहम खोत, आर्यन खोत, चिन्मय खोत, साहिल खोत आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here