मीरा रोडचा डबल डेकर फ्लायओव्हर चर्चेत

0
62
मीरा रोडचा फ्लायओव्हर चर्चेत
मीरा रोडचा फ्लायओव्हर चर्चेत

मीरा रोडचा डबल डेकर फ्लायओव्हर चर्चेत

मुंबई | प्रतिनिधी

मीरा रोड–भाईंदर परिसरातील डबल डेकर फ्लायओव्हर सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अभियांत्रिकीचा नमुना म्हणून सादर करण्यात आलेला हा पूल प्रत्यक्षात मात्र ‘विचित्र रचना’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

चार पदरी रुंदीने सुरू होणारा हा फ्लायओव्हर पुढे अचानक दोन पदरी होत असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. या पुलाचा आणि मुंबई मेट्रोच्या पुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ‘विकास की गैरव्यवस्था?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजांकडे दुर्लक्ष करून हा पूल उभारण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे मीरा भाईंदरमधील हा डबल डेकर ब्रिज कौतुकापेक्षा टीकेचा विषय ठरत आहे.

नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक गरजांचा अभ्यास न करता हा पूल उभारण्यात आल्याचा आरोप होत असून, नियोजनातील त्रुटींबाबत जबाब -दार यंत्रणांनी खुलासा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here