प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन

0
44
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन

सिंधुदुर्गनगरी l प्रतिनिधी

.भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भारतीय संविधानामुळे भारताची जागतिक पातळी

वर सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळख निर्माण झाली. संविधान हे देशाचा आत्मा असून स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता ही मूल्ये जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचे स्मरण करण्यात आले.

मुख्यमंत्री शिष्यवृत्ती मिळवल्याबद्दल पालकमंत्री महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुरस्काराचे स्वरूप (प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह) 1) सार्जंट, अनंत अभिजीत चिंचकर 2) सार्जंट. संस्कार सुशांत धुरी 3) कु. मनस्या निलेश फाले

प्रशिक्षकांनाही पुरस्कार देण्यात आले 1) श्री. गोपाळ गवस, NCC अधिकारी प्रशिक्षक 1st ऑफिसर 2) श्रीम. आर्या भोगले NCC अधिकारी प्रशिक्षक 2nd ऑफिसर 3) श्री. निखिल तेली, NCC अधिकारी प्रशिक्षक

सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, सिंधुदुर्गनगरी या शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतांवर सामुहिक कवायतीचे सादरीकरण यावेळी झाले. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने दहशतवादी हल्लाविषयी प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले.

यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलनाबद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here