अरिजीत सिंगची प्लेबॅक सिंगिंगमधून जाहीर निवृत्ती
मुंबई l प्रतिनिधी
भारतीय संगीत क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला गायक अरिजीत सिंग याने एक अत्यंत धक्कादायक आणि चाहत्यांना भावूक करणारा निर्णय घेतला आहे. अरिजीतने चित्रपटांसाठी गाणे सोडण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने ही शॉकिंग बातमी दिल्याने संगीत विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
अरिजीतने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक संदेश शेअर केला आहे. यात त्याने म्हटले की, नमस्ते, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोते म्हणून मला जे प्रेम दिले, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आता मी इथून पुढे प्लेबॅक सिंगर म्हणून कोणतेही नवीन काम घेणार नाहीये. मी हा प्रवास इथेच थांबवत आहे. हा प्रवास अत्यंत सुंदर होता.ने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत ३०० हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.


