उपमुख्यमंत्र्यांच्या चार्टर्ड विमान अपघाताची चौकशी सुरू
बारामतीl | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला बुधवारी सकाळी बारामती येथे अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह दोन पायलट, एक फ्लाइट अटेंडंट आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर राज्यात शोककळा पसरली असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या अपघातात कॅप्टन सुमित कपूर यांचाही मृत्यू झाला आहे. विमान अपघात तपास यंत्रणा (AAIB) आणि नागरी तपास प्रक्रियेदरम्यान पायलट्सची व्यावसायिक पार्श्वभूमी, उड्डाणाचा अनुभव, वैद्यकीय तपासणी अहवाल, ड्युटी टाइम रेकॉर्ड, तसेच विमानाचे मेंटेनन्स रेकॉर्ड यांचा अभ्यास केला जात आहे. तपासात सुमित कपूर यांच्या व्यावसायिक कारकिर्दीशी संबंधित गंभीर आणि वादग्रस्त माहिती उघड झाली आहे. अधिकृत यंत्रणांकडून तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्घटनेबाबत ठोस माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे चार्टर्ड विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, नागरी विमान सुरक्षेचे नियम आणि त्यांची अंमल बजावणी याकडे लक्ष वेधले जात आहे. अपघातात मृत्यू झालेले . या अपघाताचा सध्या तपास सुरू आहे. तपास यंत्रणांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच अपघाता मागील खरी कारणे समोर येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


