सावंतवाडी – : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सावंतवाडी शहरातील एका युवकासह दोन युवतींना रात्री उशिरा येथील न्यायालयात हजर केले असता तिघांनाही २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. https://sindhudurgsamachar.in/kokan-चोरीचे-दागिन्यांसह-तीन-म/
सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणाऱ्या तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी सावंतवाडी शहरातील कामरान आयुब संगत्राश ( १८, रा. बाहेरचावाडा सावंतवाडी ), समरीन जहीर खान बिजली ( १९, बाहेरचा वाडा ) व लबिबा कादर खान ( २१, रा. बाहेरचा वाडा सावंतवाडी ) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यातील वरील तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या तिघांनाही २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे ॲड. वेदिका राऊळ यांनी युक्तिवाद केला.