नवी मुंबई: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पक्षाच्या वर्धापन दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. उमेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून तथा मार्गदर्शनाखाली व नवी मुंबई ग्रंथालय विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई आरकडे यांच्या पुढाकाराने ‘शरद वाचनालय व अभ्यासिका’ उद्घाटन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.अशोक गावडे साहेब व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. नामदेव भगत साहेब यांच्या शुभहस्ते तथा आमदार श्री. शशिकांत शिंदे साहेब व नवी मुंबई निरीक्षक श्री. प्रशांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष श्री. जी एस पाटील, व सरचिटणीस श्री. मल्लिकार्जुन पुजारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते श्री. राजू देशमुख व नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा सौ प्राजक्ता ताई मोंडकर, कार्याध्यक्षा सौ सुनीता ताई देशमुख आणि सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच ऐरोली व बेलापूर विधानसभेचे व ग्रंथालय विभागाचे कार्याध्यक्ष ललित साळुंखे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या मध्यवर्ती कार्यालयात रोज १० वर्तमान पत्र (मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर भाषेत) श्री ललित साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष ग्रंथालय विभाग यांच्या वतीने देण्यात येणार आहे.