आंगणेवाडीत श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९–१० फेब्रुवारीला

0
35
आंगणेवाडीत श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९–१० फेब्रुवारीला
आंगणेवाडीत श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९–१० फेब्रुवारीला

आंगणेवाडीत श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९–१० फेब्रुवारीला

मालवण l प्रतिनिधी :

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत दाखल होणारा प्रत्येक भाविक केंद्रबिंदू मानून, त्यांना विनाविलंब दर्शन मिळावे यासाठी आंगणे कुटुंबीयांनी प्रशासनाच्या सहकार्याने सखोल नियोजन केले आहे.

जत्रोत्सवाच्या दिवशी, ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता दर्शन रांग सुरू होणार असून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.रात्री ९ ते १२ या वेळेत धार्मिक विधींसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर मध्यरात्री १ नंतर पुन्हा दर्शन रांग सुरू होणार असून, १० फेब्रुवारी मोड जत्रेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली.

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमी -वर शुक्रवारी सायंकाळी श्री भराडी देवी मंदिराच्या प्रांगणात पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी मंडळाचे सचिव काका आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, बाबू आंगणे आदी उपस्थित होते. जत्रोत्सव उत्साहात व शिस्तबद्ध पार पडावा, यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.गतवर्षी आढळलेल्या त्रुटी दूर करून यंदा काही बदल करण्यात आले असून, भाविकांसाठी एकूण नऊ दर्शन रांगा ठेवण्यात येणार आहेत. तसेच मान्यवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here