सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कराटे -पटूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका
सिंधुदुर्ग l प्रतिनिधी
मुलुंड, मुंबई येथे झालेल्या आंतर – राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वेळकर कराटे-डो अकॅडमी च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्या-तील ६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
ही स्पर्धा वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे ऑर्गनाय -झेशन मार्फत रविवारी दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती व या स्पर्धेत १३ देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत शाळा गजानन विद्यालय पाट चे हर्षदा गणेश जोशी व राजदत्त गिरीप्रसाद राऊळ, नेरुळ माडयाची वाडी प्राथमिक शाळेतील संस्कृती संतोष परब, अण्णासाहेब देसाई विद्यालय, परुळे येथील तौफिक इम्तियाज अंसारी या सर्व विद्यार्थ्यांनी काता व कुमीते या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकांची कमाई केली व दिक्षा नागेश बुट्टे हिने काता प्रकारात सुवर्ण व कुमीते प्रकारात कांस्य पदक मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक श्री. महादेव धोंडू वेळकर यांनी सुद्धा काता व कुमीते दोन्ही प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक यांनी मिळून भारत देशासाठी ११ सुवर्ण व १ कांस्य असे एकूण १२ पदकांची कमाई केली आहे.या विद्यार्थी व प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


