मुंबई : वयाच्या ४३व्या वर्षी जागतिक लॉन टेनिस मध्ये अव्वल स्थानावर पोहोचलेल्या भारताच्या टेनिस पटू रोहन बोपण्णा याचा गौरव करताना आज खार जिमखान्याच्या वतीने त्याला आजीवन सदस्यत्व देण्यात आले. खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी, आणि जिमखान्याचे संयुक्त सचिव सारिका दीपेन, साहिब सिंग लांबा आणि खजिनदार लवीन खेमनानी यांच्या हस्ते स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याला आजीवन सदस्यत्व देण्यात आले. आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात आपण खार जिमखान्यातील टेनिस स्पर्धेत खेळल्याची आठवण बोपण्णा याने सांगितली. मुंबईतील एक आघाडीची क्रीडा संस्था असणाऱ्या खार जिमखान्याच्या या गौरवामुळे आपण भारावल्याचे त्याने सांगितले. ही संस्था विविध खेळांना प्रोत्साहन देत आहे हे पाहून त्याने आनंद व्यक्त केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-उद्धवजी-ठाकरे-यांच्या-हस/
ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद हा आपल्या आयुष्यातील सुवर्ण क्षण होता असेही त्याने सांगितले. खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी हे सातत्याने माझ्या संपर्कात होते आणि त्यामुळेच आज मी येथे आलो आहे. खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात खार जिमखाना नेहमीच आघाडीवर असतो याबद्दल ही त्याने गौरवोद्गार काढले. शिवाय या कार्यक्रमाला मुंबईचे क्रिकेटपटू आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी सदस्य जतीन परांजपे यावेळी आवर्जून उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यासाठी वाढते वय हा अडथळा ठरू शकत नाही हेच यंदा ४३ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या रोहन बोपण्णा याने सिद्ध करून दाखविले आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविणारा तो जगातील पहिला वरिष्ठ टेनिसपटू ठरला आहे. जानेवारी महिन्यातच त्याने आपला सहकारी मॅथ्यू एबडन याच्या साथीने सायमन बोलेली आणि अँड्रिया ववासोरी या इटालियन जोडीला दोन सरळ सेट मध्ये पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
***********
विजय बने – ९८१९०५९६७७
फोटो ओळी – वयाच्या ४३ वय वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावून जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या रोहन बोपण्णा याला खार जिमखान्याचे आजीवन सदस्यत्व देताना खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी. त्यांच्या सोबत डावीकडून जिमखान्याचे संयुक्त सचिव सारिका दीपेन, साहिब सिंग लांबा दिसत आहेत.