Kokan: महोदय पर्वणीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर 

0
68
महोदय पर्वणीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर 
महोदय पर्वणीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर 

वेंगुर्ले: सुरेश कौलगेकर 

पौष अमावास्येला झालेल्या महोदय पर्वणी निमित्त वेंगुर्ला सागरेश्वर व आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर भाविकांचा जनसागर उसळला या ठिकाणी विविध गावच्या ग्रामदेवता, तरंगदेवता सहित हजारो भाविक, ग्रामस्थांनी तिर्थस्नान केले. तब्बल पन्नास वर्षानंतर व पस्तीस वर्षानंतर काही देवतांनी तीर्थस्नान केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-आंब्रड-आणि-पोखरण-गावातील/

पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्याने झालेल्या महोदय पर्वणीला वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्वर किनाऱ्यासहित आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सागरेश्वर समुद्र किनारी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी व  तरंगदेवता सहित वेंगुर्ले तालुक्यातील मठ, कुडाळ तालुक्यातील उपवडे, बांबूळी, मांडकुली, पुळास, आंबडपाल, साळगाव तर आरवली सागरतीर्थ येथे श्री रवळनाथ पंचायतन देवस्थान सातार्डा, श्री रवळनाथ माऊली देवस्थान कास, श्री देवी माऊली रवळनाथ देवस्थान कवठणी, श्री भूतनाथ देवस्थान निरवडे, श्रीदेवी माऊली देवस्थान मडूरा, श्री भूतनाथ देवस्थान निरवडे आजोबा गावकर सोनुर्ली, श्री देव नारायण पंचायतन देवस्थान आसोली, श्री देव वेतोबा नानोस, श्री वेतोबा पंचायतन आजगाव, श्रीदेवी माऊली तिरोडा, श्रीदेवी माऊली पंचायतन शिरोडा आदी देवता तरंगकाठी, पालखी घेऊन समुद्रस्नानासाठी आले होते.

यावेळी उभादांडा ग्रामपंचायत यांच्या वतीने भाविकांसाठी पाणी, चेंगिंग रूम तसेच इतर विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी बैठक व्यवस्था, मोफत नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय व चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांच्या वतीने भाविकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, वसंत तांडेल, हितेश धुरी, शिवसेना शहरप्रमुख संतोष परब, उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या सहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. 

यावेळी उभादांडा ग्रामपंचायतच्या वतीने सागर रक्षक वेळोवेळी भाविकांना सूचना देत होते. तर येथील स्थानिक युवक ललित गिरप यांच्या सहित युवक आपल्या बोट द्वारे फिरून खोल समुद्रात जाणाऱ्या भाविकांना वेळोवेळी सूचना देत होते. दुपारी वेंगुर्ले येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी, श्री देव रामेश्वर व तरंग देवता यांनी समुद्र स्नान केल्यानंतर सर्व देवता माघारी परतले. तर भाविक व नागरिकांनी सायंकाळी सुर्यास्तापर्यंत या पवित्र स्नानाचा लाभ घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here