रायगड जिल्ह्यात वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सवलत

0
86
रायगड जिल्ह्यात वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सवलत
रायगड जिल्ह्यात वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सवलत

रायगड जिल्ह्यात वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सवलत

चिपळूण :l प्रतिनिधी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास

वाजेपर्यंत सवलत देण्याचे अधिकार आहेत.

त्यानुसार रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ दिवसांसाठी सवलत देणारी अधिसूचना जारी केली आहे.

या आदेशानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी विहित ध्वनीमर्यादा पाळून सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सवलत देण्यात आलेले दिवस पुढीलप्रमाणे :

  • शिवजयंती – १९ फेब्रुवारी (१ दिवस)
  • होळी पौर्णिमा – २ मार्च (१ दिवस)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल (१ दिवस)
    • ईद-ए-मिलाद – २६ ऑगस्ट (१ दिवस)
    • गणपती उत्सव – १५ सप्टेंबर (दुसरा दिवस)
    • १९ सप्टेंबर (गौरी विसर्जन) व २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) – ३ दिवस
    • गणपती साखरचौथ विसर्जन – ३० सप्टेंबर (१ दिवस)
    • नवरात्री उत्सव – १७ ते२० ऑक्टोबर (४ दिवस)
    • दिवाळी (लक्ष्मीपूजन) – ८ नोव्हेंबर (१ दिवस)
    • ख्रिसमस – २५ डिसेंबर (१ दिवस)
    • ३१ डिसेंबर – (१ दिवस)

    दरम्यान, ही सवलत राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ध्वनीप्रदूषण नियम २००० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १९ (अ) नुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

    जिल्हा प्रशासनाने नागरिक, मंडळे व आयोजकांनी ध्वनीमर्यादांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. उत्सव साजरे करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

    सण-उत्सवांचा आनंद आणि पर्यावरणाचे संरक्षण यामध्ये समतोल राखणे आवश्यक असून, ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासन सतर्क राहणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here