टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांची तक्रार करा; फास्टॅगमध्ये मिळवा ₹ १,००० प्रोत्साहन

0
33
टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांची तक्रार करा; फास्टॅगमध्ये मिळवा ₹ १,००० प्रोत्साहन
टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांची तक्रार करा; फास्टॅगमध्ये मिळवा ₹ १,००० प्रोत्साहन

टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांची तक्रार करा; फास्टॅगमध्ये मिळवा ₹ १,००० प्रोत्साहन

दिल्ली l प्रतिनिधी

टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांची तक्रार करा; फास्टॅगमध्ये मिळवा ₹१,००० प्रोत्साहन जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. टोल प्लाझांवरील अस्वच्छ किंवा घाणेरड्या शौचालयांबाबत तक्रार नोंदविल्यास संबंधित वाहनधारकांच्या फास्टॅग खात्यात ₹१,००० इतके प्रोत्साहनपर बक्षीस जमा केले जाणार आहे.

ही तक्रार ‘राजमार्गयात्रा’ या अधिकृत मोबाईल अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. प्रवाशांनी टोल प्लाझावरील स्वच्छतागृहांची छायाचित्रांसह माहिती अॅपवर अपलोड केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाईल. तक्रार योग्य आढळल्यास संबंधित रक्कम फास्टॅग खात्यात जमा केली जाईल.

राष्ट्रीय महामार्गांवरील सुविधा सुधारण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सहभागातून टोल प्लाझांवरील मूलभूत सुविधांची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ही योजना आता ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली असून वाहनचालकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत तक्रार करताना वेळ, ठिकाण आणि टोल प्लाझाचे अचूक तपशील नमूद करणे आवश्यक आहे. खोटी किंवा अपूर्ण माहिती दिल्यास तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे टोल प्लाझावरील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुस्थितीत राहण्यास मदत होणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here