वेंगुर्ला प्रतिनिधी – माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आयोजित केलेल्या भितीचित्र महोत्सवात अक्षय जाधव याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने नगरवाचनालय येथे शाडू मातीपासून आकर्षक मूर्ती बनवून पारंपरिक लोककला जपणारे मूर्तीकार, कोकणातील स्थानिक मच्छिमार, वेंगुर्ला शहराची ओळख असलेले शून्य कचरा केंद्र आदींविषयी माहिती देणारे आकर्षक चित्र रेखाटले. https://sindhudurgsamachar.in/kokan-शांताबाई-कौलगेकर-यांचे-न/
या स्पर्धेसाठी नगरपरिषदेमार्फत सहभागी स्पर्धकांना भिंतीचित्र काढण्यासाठी भिंती करून देण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना आवश्यक ते सर्व रंग नगरपरिषदेमार्फत पुरवण्यात आले होते. यात १० स्पर्धकांनी सहभाग घेतला. वेंगुर्ला शाळा नं.२ येथे प्रणय सावंत याने विविध प्राणी व पक्षी, वन्य जैव विविधता आणि त्यांचे संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणारे काढलेल्या भितीचित्राला द्वितीय क्रमांक, इंद्रधनू पार्क, भटवाडी येथे आदित्य गावडे ग्रुपने रेखाटलेल्या हिदू संस्कृती दर्शविणारे राम मंदिर, विठ्ठल आणि वेंगुर्ला बंदर यांची चित्रे तसेच हरवलेला वासुदेव या भितीचित्राला तृतीय क्रमांक देण्यात आला. तर रोहन हळदणकर ग्रुपने भटवाटी मुख्य रस्त्यावर काढलेल्या वेंगुर्लामधील विविध यात्रा, सण, उत्सव, दशावतारला, विक्रांत सावंत ग्रुपने भटवाडी मुख्य रस्त्यावर काढलेल्या प्लॅस्टिक टाळा व समुद्रीजीवन वाचवा याला तसेच अमृत जामदार ग्रुपने कॅम्प येथे काढलेल्या कलात्मक ग्राफिटीला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी १ हजार रूपयांचे बक्षिस देण्यात आले.
फोटोओळी – भिंतीचित्र महोत्सव स्पर्धेत अक्षय जाधव याने चित्र रेखाटून प्रथम क्रमांक पटकाविला.