चित्रपटाच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या जीवनशैलीचे अंतरंग उलगडता येते – प्रकाश पांचाळ
चित्रपटाच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या जीवनशैलीचे अंतरंग उलगडता येते – प्रकाश पांचाळ
जेजुरी l विजयकुमार हरिश्चंद्रे
गुळूंचे – सामाजिक जीवनात जनजागृती घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट होय. स्वातंत्र्याचा संग्राम पेटवणाऱ्या आणि क्रांतीची खरी ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती समाजासाठी अर्पण केली. अशा शूर, धाडसी आणि पराक्रमी क्रांतिकारकांच्या जीवनातील अंतरंग रुपेरी पडद्यावर साकार करणे हे जरी जिकिरीचे कार्य असले तरी इतिहासाच्या झरोख्यातून उलगडलेला प्रत्येक दृष्टिकोन समाजाला नवी दिशा देतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने दिग्दर्शक प्रकाश पांचाळ यांनी केले.
ते गुळूंचे येथे आयोजित जय मल्हार ग्रामीण विकास शिक्षण संस्था यांच्या कला महोत्सवात बोलत होते. संस्थेच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध उद्योजक राजकुमार धुरगुडे यांनी भूषविले. यावेळी जयंतराव जाधव, अशोकराव टाळकुटे, अभिनेते विनोद शिंदे, पंचायत समिती सदस्या सौ.स्मिता निगडे, प्रसिद्ध पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे, संतोष निगडे सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, अमोल लोळे, राजकीय विश्लेषक कांचन निगडे, संस्थापक सोमनाथ खोमणे, नीता खोमणे, सुदर्शन जैन,मिलिंद केंडे,संजय मदणे मुख्याध्यापीका सुषमा भुंजे जयजित खोमणे, योगेश ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते
गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘मार्तंड कलारत्न’ पुरस्कार यंदा दिग्दर्शक प्रकाश पांचाळ समाजभूषण रत्न’ आणि सुशील गायकवाड यांना आदर्श ‘शिक्षक’ पुरस्कार देऊन राजकुमार धुरगुडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संस्था गेली अकरा वर्षे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. पर्यावरण संवर्धन, निसर्ग वृद्धी, विद्यार्थ्यांना ज्ञान-विज्ञानाचे धडे देणे तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे, अशी विविध कार्ये संस्था राबवत आहे. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्यास विविध क्षेत्रातीलयांना प्रदान करण्यात आला. तसेच अशोकराव टाळकुटे यांना ‘शिक्षक मार्तंड शिक्षणरत्न’, जयवंत जाधव यांना ‘मार्तंड मान्यवर उपस्थित राहून संस्थेच्या कार्याला यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी केलेल्या प्रभावी नियोजनाचे कर्मचारी व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा कार्यरत होती.