वेंगुर्ला प्रतिनिधी – उभादांडा येथील प्रसिद्ध श्री मानसीश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. भगवा झेंडा, केळी, नारळ, पेट्रोमॅक्स बत्ती यापैकी सांगणे केल्याप्रमाणे देवास अर्पण करून आपला नवस पूर्ण करतात. रात्रौ पार्सेकर द.ना. मंडळाचे नाटक होणार आहे. हे नाटक गॅसबत्तीच्या प्रकाशात होत असते म्हणून या जत्रेला ‘बत्तीची जत्रा‘ असेही संबोधले जाते. भाविकांनी जत्रौत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन मानसीश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-ज्येष्ठ-नागरिकांसाठी-आय/
या जत्रेच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला दाभोसवाडा येथील संजू हुले याने झुलत्या पुलानजिक मानसीश्वर मंदिराचे आकर्षक वाळू शिल्प रेखाटले आहे.
फोटोओळी – संजू हुले यांनी मानसीश्वर मंदिराचे वाळूशिल्प रेखाटले.