रोहित पवारांचा खळबळजनक आरोप: अजित पवारांचे विमान अपघात मुद्दाम घातपात?

0
47
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप: अजित पवारांचे विमान अपघात मुद्दाम घातपात?
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप: अजित पवारांचे विमान अपघात मुद्दाम घातपात?

रोहित पवारांचा खळबळजनक आरोप: अजित पवारांचे विमान अपघात मुद्दाम घातपात?

पुणे l प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातासंदर्भात आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की हा अपघात नाही, तर मुद्दाम घातपात असण्याचा संशय आहे. त्यांनी या बाबतीत अनेक मुद्दे उभे केले, ज्यावर पुढील तपास आवश्यक आहे.

अपघाताचा संदर्भ आणि संशय

  • बारामतीला विमान उतरवताना दृश्यमानता कमी होती, तरीही विमान उतरवण्याचे प्रयत्न करणे टाळले जाऊ शकले असते
  • विमानाला मुंबईकडे परत नेण्याचा पर्याय होता, मात्र तसे केले गेले नाही.
  • त्यामुळे अपघात स्वाभाविक नाही, तर उद्देशपूर्वक घडवला गेला असावा,
  • विमानातील इंधनाचे प्रमाण आणि इंधन कॅन

  • विमानात मोठ्या प्रमाणात इंधन भरलेले होते.
  • शिवाय अतिरिक्त इंधनाचे अनेक कॅन टॉयलेटजवळ ठेवण्यात आले होते, जे नियमाविरुद्ध होते.
  • अधिक इंधनामुळे अपघातानंतर वारंवार स्फोट होण्याची शक्यता वाढते, असे रोहित पवारांनी म्हटले.
  • कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर आणि नियमभंग

    • सरकारी नियमानुसार कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरने किमान २ तास संभाषण रेकॉर्ड केले पाहिजे, पण या विमानाचे रेकॉर्डिंग फक्त ३० मिनिटांचे होते.
    • विमानाची खरेदी आणि नोंदणी वेगळ्या वेळेस झाली, ज्यामुळे नियमांचे पालन झाले नाही.

    विमानाचे तांत्रिक दोष आणि उड्डाण वेळा

    या विमानाला ५,००० तास उड्डाणाची परवानगी होती, पण

    • विमानाने ८,००० तासांपेक्षा जास्त उड्डाण केले होते.
    • हे विमान बारामतीहून हैदराबादकडे जाणार होते, पण सुरतवरून मुंबईला येताना इंधनाचे टाकी पूर्ण भरल्या होत्या, ज्यामुळे सुरक्षा धोका निर्माण झाला.

    स्फोट आणि ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत संशय

    • अपघातानंतर विमानात अनेक वेळा स्फोट झाले.
    • ब्लॅक बॉक्स वॉशरूमजवळ होता आणि जळल्याची माहिती आहे.
    • रोहित पवार यांनी या सर्व बाबींवरून सर्व घटना संशयास्पद असल्याचा आरोप केला.

    तपास निष्पक्ष होण्यासाठी मागण्या

    • देशाबाहेरील दोन एजन्सींची मदत घेऊन तपास करावा.
    • राज्याचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते, कुटुंबीय आणि पक्षाचे प्रतिनिधी, तसेच तज्ज्ञांची समिती नेमून तपास पारदर्शक व्हावा.

     रोहित पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आवाहनही केले.

  • रोहित पवारांचे आरोप विमान अपघाताच्या तपासावर संपूर्ण प्रकाश टाकतात आणि सार्वजनिक तसेच राजकीय चर्चा सुरु करत आहेत. या खुलाश्यानंतर अपघाताच्या तपासात निष्पक्षता आणि पारदर्शकता राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे दबाव वाढण्याची शक्यता आहे.

    राजकीय पार्श्वभूमी – पक्ष विलिनीकरण आणि प्रदेशाध्यक्ष

    • रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेत दिवंगत अजित पवार सक्रिय होते.
    • एकत्रित पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती ठरलेली होती.
    • सुमारे १३ बैठका ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाल्या, ज्यामध्ये विलिनी -करणाच्या अंतिम टप्प्यांवर चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here