⭐साई कला मंच कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते राजु गवंडे आणि नगरसेविका श्रेया गवंडे यांचा सन्मान
⭐साई कला क्रीडा मंडळाच्या वतीने नुतन तहसिलदार श्री विरसिंग वसावे यांचाही सन्मान राजु गवंडे यांच्या हस्ते
कुडाळ (प्रतिनिधी)– कुडाळ नाबरवाडी येथे साई कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमात कुडाळ तहसिलदार श्री विरसिंग वसावे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री वसावे बोलत होते. https://sindhudurgsamachar.in/koakn-क्विज-आयटी-टेकफेस्टची-ज/
या कार्यक्रमावेळी बोलताना श्री वसावे म्हणाले, आपण कुडाळ तालुक्यात २००४ मध्ये ट्रेनिंग तहसिलदार म्हणून आलो होतो. आज कुडाळ तहसिलदार म्हणून कार्यभार स्वीकारला असता कुडाळ शहर झपाट्याने प्रगतीकडे गेलेले पहायला मिळाले. असे सांगुन श्री वसावे म्हणाले, आज मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजु गवंडे आणि श्रेयाताई गवंडे या दांपत्यांचा सन्मान होतो ही खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण ही शाल पुढच्या सामाजिक कार्यासाठी उभारी देऊन काम आणखीन जोमाने करण्याची उर्जा देते असे सांगुन ते म्हणाले, ‘माझा ही तुम्ही सन्मान केलात त्या बद्ल धन्यवाद देऊन या तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची ताकद मला इथल्या देवतेने देऊन तुम्हा जनतेचे आशिर्वाद आम्हाला मिळु देत’ असे गौरवोद्गार श्री वसावे यांनी काढले.
यावेळी राजु गवंडे आणि श्रेयाताई गवंडे या दांपत्यांचा शिवप्रतिमा व शाल, श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाला कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,गुरु गडकर , अमरसेन सावंत,उदय बाणे,साईश नाबर, रोहीत राऊळ, हेमंत गवंडे,गोट्या पंडीत, प्रथमेश राऊळ, श्रीराम काजरेकर, सचिन खोत, संदेश सावंत, धनंजय परब,ओम गवंडे,तोरस्कर सर, राठोड सर,बाळा गवंडे व इतर उपस्थित होते.