Kokan: जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत शुभ्रा स्टार तुळस विजेता

0
74
‘गरूडझेप महोत्सव २०२४‘ ,
जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत शुभ्रा स्टार तुळस विजेता

वेंगुर्ला प्रतिनिधी- जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाने ‘गरूडझेप महोत्सव २०२४‘ अंतर्गत २४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा उत्तोरत्तर रंगतदार आणि चढाओढीची ठरली. यात शुभ्रा स्टार तुळस विजेता तर सिद्धेश्वर म्हाळदेवी तळावडा संघ उपविजेता ठरला. https://sindhudurgsamachar.in/kokan-गरूडझेप-अंतर्गत-शिबिरात/

 मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेचा बहुसंख्य रस्सीखेच प्रेमींनी आनंद लुटला. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक सुहास गवंडळकर यांच्या हस्ते झाले. पोपटग्रुप नाद बैलगाडा तृतीय तर सिद्धेश्वर डाळकर तळवडा यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेत सुमारे १६ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परिक्षण किशोर सोन्सुरकर, हेमंत गावडे, हेमंत नाईक, गौरेश वायंगणकर यांनी केले. स्पर्धेचे निवेदन जयेश परब यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या तुळस संघास प्रातिनिधीक स्वरूपात गौरविण्यात आले. तर २६ फेब्रुवारी रोजी होणा-या विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी रस्सीखेच स्पर्धेतील प्रथत तीन क्रमांकांना ५ हजार, ३ हजार, २ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे दिली आहे.

फोटोओळी – रस्सीखेच स्पर्धेतील विजेता शुभ्रा स्टार तुळस संघास प्रातिनिधीक स्वरूपात गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here