सिडकोच्या १६,८७६ घरांच्या योजनेत पर्याय निवडीसाठी १९ मार्चपर्यंत मुदतवाढ

0
35
सिडकोच्या १६,८७६ घरांच्या योजनेत पर्याय निवडीसाठी १९ मार्चपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या १६,८७६ घरांच्या योजनेत पर्याय निवडीसाठी १९ मार्चपर्यंत मुदतवाढ

सिडकोच्या १६,८७६ घरांच्या योजनेत पर्याय निवडीसाठी १९ मार्चपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ सदनिकांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी १९ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून तसेच अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उभारण्यात येणाऱ्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोची उत्कृष्ट जोडणी लाभली असून नागरिकांना सोयीस्कर व आधुनिक शहरी जीवनशैलीची संधी मिळणार आहे.या योजनेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ असून पसंतीचे पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ आहे. इच्छुक नागरिकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here