फिनो पेमेंट्स बँकेचे सीईओ ऋषी गुप्ता यांना अटक

0
38
फिनो पेमेंट्स बँकेचे सीईओ ऋषी गुप्ता यांना अटक
फिनो पेमेंट्स बँकेचे सीईओ ऋषी गुप्ता यांना अटक

फिनो पेमेंट्स बँकेचे सीईओ ऋषी गुप्ता यांना अटक

मुंबई l प्रतिनिधी

फिनो पेमेंट्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी गुप्ता यांना जीएसटी कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २७ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ३:५५ वाजता जीएसटी कायद्याच्या कलम १३२(१)(अ) आणि १३२(१)(i) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

मात्र ही अटक थेट बँकेच्या जीएसटी अनुपालनाशी संबंधित नसून बँकेच्या काही व्यावसायिक भागीदारांवर असलेल्या करचुकवेगिरीच्या आरोपांशी जोडली गेली असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणातील कथित रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने हा अजामीनपात्र गुन्हा मानला जात असून दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, बँकेकडून दिलेल्या माहितीनुसार तपास मुख्यत्वे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या तृतीय पक्ष प्रोग्राम मॅनेजर्सवर केंद्रित आहे. या प्रकरणामुळे आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.

अटकेच्या दिवशीच गुप्ता यांच्या कार्यकाळाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत भागधार -कांचे मतदान सुरू होते. तसेच हीच पेमेंट बँक स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळवणारी पहिली संस्था ठरली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे आर्थिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here