Maharashtra: पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्ता सील,तीन कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी

0
67
पावशी सर्व्हिस रस्ता,
पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा निलेश राणे यांचा शब्द.

पुणे- पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केली आहे. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने पुणे महानगरपालिकेने मंगळवारी त्या हॉटेलला सील ठोकली आहे. मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी होती. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेस-ग्रंथालय/

पुण्यात अनेकांनी मालमत्ता कर थकवला आहे. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळातील व्यक्तींनाही झटका बसल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. पाच पथकांद्वारे पुणे शहराच्या विविध भागात थकबाकी न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बँड वाजवून थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जात आहे.

शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे. या मॉलची एकूण पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी एक कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची तीन कोटी ७७ कोटी थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.

मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘मंगळवारी दिवसभरात एकूण १६ मिळकती सील करून आठ कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यापैकी मॉलमधील हॉटेलची तीन कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने हॉटेल सील केले आहे. पण त्यांनी अद्याप रक्कम भरलेली नाही.’’ दरम्यान, महापालिकेच्या पथकाने हॉटेल सील केले, तो पर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना ही मिळकत कोणाची आहे याची काहीच माहिती नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here