Kokan: सिंधुदुर्गचे पारसमणी, गोरगरिबांचे डॉक्टर – डॉ. शरीफ गिरकर.

0
81
डॉक्टर,
सिंधुदुर्गचे पारसमणी, गोरगरिबांचे डॉक्टर - डॉ. शरीफ गिरकर.
  • तब्बल ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे धन्वंतरी देवगड-मोंड पंचक्रोशीतच नव्हे तर खेड्यापाड्यांमध्ये, दुर्गम ठिकाणी जावून रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. शरीफ हसनखान गिरकर यांना परिसरातील आबालवृध्दांमध्ये अतिशय आदराचे स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंड मध्ये १९७७ च्या सुमारास त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. मुंबईहून वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर, LCEH पूर्ण केल्यानंतर मुंबई व इतर शहरी भागात वैद्यकीय सेवा देण्याची संधी उपलब्ध असताना त्यांनी आपल्या गावी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्धार केला व तो पूर्णत्वास नेला.

देवगड मोंड सारख्या दुर्गम भागात बस सेवा, एसटी, रिक्षा सेवा उपलब्ध नसताना व तुरळक सेवा उपलब्ध असताना डॉ. गिरकर यांनी या परिसरातील गावागावांमध्ये जावून रुग्ण तपासणी केली आहे. कोकणातील सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचे भान राखून रुग्णांकडून अतिशय कमी शुल्क घेणे. अनेकदा स्वतःच्या खिशातून गरजू रुग्णांना बससाठी पैसे देणे यामध्ये डॉ गिरकर नेहमी अग्रेसर असतात. हाताला गुण असल्याने व गोरगरिबांच्या परिस्थितीची जाणिव असलेल्या डॉ. गिरकर यांचे परिसरात मोठे नाव आहे. – डॉ. शरीफ हसनखान गिरकर यांचा जन्म २ मार्च १९५३ रोजी मोंड मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मोंडमध्ये झाले. महाविद्यालयीन व वैद्यकीय शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर त्यांनी मसीना रुग्णालयात प्रॅक्टीस केली. त्यानंतर ते मोंड मध्ये परतले. मोंड मधील मुस्लिम समाजातील पहिले डॉक्टर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. https://sindhudurgsamachar.in/kokan-दहावीच्या-परीक्षार्थीस/

ज्या रुग्णांना अधिक उपचारांसाठी देवगड, कणकवली किंवा ओरोसला पाठवायचे असेल तर डॉक्टर अनेकदा रुग्णासोबत जात असत त्यामुळे धास्तावलेल्या रुग्णाला व नातेवाईकांना आधार मिळत असे. पैसे कमावणे, कट प्रॅक्टिस करणे हा हेतू कधीच डॉक्टरांनी आपल्यासमोर ठेवला नाही. त्यामुळे रुग्णांकडून डॉक्टरांना कमी पैसे मिळाले तरी प्रेम मात्र नेहमीच भरभरुन मिळाले.

रुग्ण देखील डॉक्टरांना भेटायला खाली हात येत नव्हते नेहमी भाजी, आंबे, फणस, काजू किंवा अगदी गावठी कोंबडीची अंडी देखील ते घेऊन येत. रात्री अपरात्री कितीही वाजता रुग्ण अगदी हक्काने डॉक्टरांना हाक मारुन तपासणीसाठी उठवतात. अगदी आज देखील हा शिरस्ता कायम आहे. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केलेली असताना देखील डॉक्टर गिरकर मात्र अव्याहतपणे वैद्यकीय सेवेत कार्यरत राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत आपण रुग्णसेवेत कार्यरत राहू असा त्यांचा निर्धार आहे. -डॉक्टरांना सुटी माहितच नसावी असा त्यांचा आजपर्यंतचा दिनक्रम आहे. रविवार असो किंवा अगदी वर्षात एकदा साजरी होणारी रमजान ईद असो, दवाखाना बंद करण्यास त्यांना मिळतच नाही. ईदच्या दिवशी दवाखाना बंद असला तरी रुग्ण आल्यावर त्यांना तो उघडावाच लागतो.

डॉक्टरांचे शेतीवर मोठे प्रेम आहे त्यामुळे वेळ मिळेल तसा ते बागेकडे लक्ष घालत असतात. डॉक्टरांची मुले उच्च शिक्षित असून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मोठी मुलगी आस्मा हिने वेंगुर्ला येथील होमिओपॅथिक महाविद्यालयातून बीएचएमएस पदवी घेतली. ती सध्या मुंबईत कार्यरत आहे. मोठा मुलगा खलील याने पत्रकारितेत चांगले नाव कमावले असून मुंबई मराठी पत्रकार संघात संयुक्त सचिव पदी काम केले आहे. सध्या कायद्याची पदवी घेऊन मुंबई उच्च न्यायालयात वकिलीमध्ये कार्यरत आहे. लहान मुलगा आकिल इंजिनियर असून दुबईमध्ये कार्यरत आहे. तर लहान मुलगी अमिना हिने भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेऊन बीएएमएस ची पदवी मिळवली आहे. ती सध्या दुबईमध्ये कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here