आडेली जि.प. मतदारसंघात भाजपमध्ये खदखद

0
193
आडेली जि.प. मतदारसंघात भाजपमध्ये खदखद
आडेली जि.प. मतदारसंघात भाजपमध्ये खदखद

आडेली जि.प. मतदारसंघात भाजपमध्ये खदखद

मनीष दळवींच्या निलंबनाची कार्यकर्त्याकडून मागणी

वेंगुर्ला l प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघातील रहिवासी व स्वतःला भाजपचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख करून देणारे समीर रुक्मांगद कुडाळकर यांनी महाराष्ट्र भाजप अध्यक्षांकडे निवेदन सादर करून भाजप नेते मनीष दळवी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

कुडाळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारी निश्चित करण्याचे अधिकार पक्षाकडून मनीष दळवी यांना देण्यात आले होते. मात्र या अधिकारांचा वापर करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, या निर्णयांमुळे तालुक्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.

कुडाळकर यांच्या निवेदनानुसार, आडेली जिल्हा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार असतानाही मनीष दळवी यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून निवडणूक अर्ज दाखल केल्याचे कुडाळकर यांनी म्हटले आहे.

कुडाळकर यांनी पुढे नमूद केले आहे की, त्यांनीही सुरुवातीला जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र पक्षाच्या सूचनेनुसार त्यांनी हा अर्ज मागे घेतला. त्यानंतर मनीष दळवी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आडेली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

यासोबतच वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारी वाटप, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवादाचा अभाव, तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या पाठिंब्याबाबतही कुडाळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची पक्षाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनीआपल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात कुडाळकर यांनी असा आरोपही केला आहे की, निवडणूक काळात काही निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या वेळीही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुरेसे महत्त्व न दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

दरम्यान, कुडाळकर यांनी आपल्या निलंबनाबाबतही आक्षेप घेतला असून, त्यांनी पंचायत समितीची निवडणूक अपक्ष उमेदवाराविरुद्ध लढवली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षातून केलेले त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या संदर्भात मनीष दळवी किंवा भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर या निवेदनाची चर्चा सुरू असून, पुढील काळात

पान ४ वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here