पश्चिम रेल्वेत ५३४९ अ‍ॅक्ट अप्रेंटिस पदांसाठी भरती; ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले

0
41
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

पश्चिम रेल्वेत ५३४९ अ‍ॅक्ट अप्रेंटिस पदांसाठी भरती; ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती कक्षातर्फे (RRC), मुंबई यांनी सन २०२५–२६ या वर्षासाठी मोठ्या प्रमाणावर अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील विविध विभाग आणि कार्यशाळांमध्ये ‘शिकाऊ उमेदवार कायदा १९६१’ अंतर्गत एकूण ५३४९ जागांसाठी ‘अ‍ॅक्ट अप्रेंटिस’ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारे उमेदवार ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिसूचनेमध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, संबंधित ट्रेड तसेच इतर आवश्यक निकषांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे शिकाऊ उमेदवार भरती २०२६ साठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

या भरतीद्वारे पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये तांत्रिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून ITI उत्तीर्ण युवकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे भरती कक्षाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here