मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ‘एआय परिषद २०२६’चे आयोजन
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एआय परिषद २०२६’ कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या परिषदेत पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता वापर, त्याचे फायदे-तोटे तसेच भविष्यातील संधी यावर चर्चा करण्यात आली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेची दिशा आणि माध्यम क्षेत्रातील नव्या शक्यता यावरही मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला पत्रकार, माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


