Kokan: कोकिसरे आणि करूळ घाट या दोन टप्प्यांत काम सुरू

0
64
कोकिसरे आणि करूळ घाट
कोकिसरे आणि करूळ घाट या दोन टप्प्यांत काम सुरू

ठेकेदाराकडून अत्यंत संथ गतीने कामाला सुरवात जणू पावसाची वाट पाहत असावा अशी.

वैभववाडी /प्रतिनिधी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम नाधवडे ते कोकिसरे आणि करूळ घाट या दोन टप्प्यांत सुरू आहे. परंतु, ठेकेदाराकडून अत्यंत संथ गतीने तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. आपण याबाबत लक्ष घालून हे केंद्रीय दळणवळण मंत्राच्या निदर्शनास आणून द्यावे ,अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईक-यांनी-मंजूर-क/

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय लोके व पदाधिकार्‍यांनी विनायक राऊत यांना निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण केलेल्या मागणीमुळे या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला. तद्नंतर दुपदरीकरणास मंजुरी मिळून कामाची तात्काळ निविदा प्रक्रिया करण्यात आली. मात्र कामाला सुरुवात करण्यास ठेकेदाराने विलंब केल्यामुळे हे काम तात्काळ सुरू होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आपल्या नेतृत्वाखाली आंदोलनही केले होते. त्यानंतर लगेचच हे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, गेल्या चार महिन्यांमध्ये या रस्त्याच्या कामाच्या प्रगतीमध्ये अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही.

नाधवडे ते कोकिसरे पर्यंतच्या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे निकृष्ट पद्धतीने काम चालू आहे. त्याचप्रमाणे कॉंक्रीटवर पाण्याचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जलद गतीने काम करता यावे म्हणून जिल्ह्याच्या दळणवळणाच्या प्रमुख मार्ग असलेला ‘करुळ घाट’ रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यात मोजक्या मोर्‍यांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे या कामाला ठेकेदाराकडून विलंब का होतोय? त्याची चौकशी करावी. तसेच ही वस्तुस्थिती केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, निवेदनात म्हटले आहे. नाधवडे ते कोकिसरे पाच किलोमीटर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता पूर्ण मातीमय असून धुळीवर पाणी मारण्याची आवश्यकता असताना त्या ठिकाणी पाणी मारले जात नाही. त्यामुळे वैभववाडी – तळेरे असा प्रवास करणार्‍या छोट्या व मोठ्या वाहनधारकांना आणि विशेषतः रस्त्याच्या शेजारील घर मालकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा महामार्ग प्राधिकरणाचे अधि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here